बाप बेटे जेलमध्ये जाणार संजय राऊत यांचं सूचक ट्विट

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.  त्यानंतर भाजपकडूनही संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर आज संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं, “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!”  असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर सातत्याने आरोप करत होते. मात्र, मंगळवारी शिवसेना भवनात संजय राऊत यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. इतके दिवस इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाच राऊतांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या या सगळ्यावर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.

Share