राणा दाम्पत्यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परबांविरोधात तक्रार दाखल

मुंबई : सकाळपासून सुरु असलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर राणा दाम्पत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यासोबतच संजय राऊत, अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

राणा दाम्पत्यांनी तक्रारीत म्हणले आहे की, आम्ही मातोश्रीसमोर केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार होतो पण त्यावेळी आमच्यावर हल्ला करण्याचा शिवसेनेचा डाव होता. त्यामुळेच तेथे रुग्णवाहिकाही ठेवली होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही तक्रारीत त्यांनी नमुद केले आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावले आणि जीवे मारण्याचा कट रचला. शिवसैनिकांनी घरासमोर आंदोलन केले. आणि आमच्या जीवाला धोका निर्माण केला. असे खार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

Share