मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे- फडणवीस सरकराने जाहीर केलेल्या मदतींचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचमामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर कराव अन्यथा काॅँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा काॅंग्रसचे प्रदेशाध्यश्र नाना पटोले यांनी दिला. आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकऱ्यावर निसर्गाने अवकृपा केली. राज्यातील विदर्भ, मराठावड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पीक वाया गेलेे. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी पिकं हातातून गेली. फळबागा व पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला, पशुधनाचेही नुकसान झाले. राज्य सरकारने मंत्रालयात बसून पंचनामे करण्याचे आदेश दिले पण स्थानिक पातळीवर प्रशासन कामच करत नसल्याचे चित्र आहे. मी स्वतः विदर्भ व मराठवाड्यातील अतवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकारी पंचनामे करण्यास येतच नाहीत, जे काही पंचानामे होत आहेत ते वस्तुस्थिती पाहून केले जात नाहीत यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने जास्त मदत दिल्याची घोषणा केली पण ही मदतही तुटपुंजीच आहे आणि तीसुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.