मुंबई- राज्याचे विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून कामकाजाचा तिसरा आठवडा सुरु आहे. अर्थमंत्री अजित पावर यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पवरील चर्चेला आज दुपारी सुरुवात झाली. याबाबतचे पहिले भाषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाषणात अर्थसंकल्प कसा फसवा आहे या मुद्द्यावरुन फडणवीस राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली.
यावेळी ते म्हणाले, राज्य सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पातील मूळ खर्च कळतच नाही. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची अवस्था या अर्थसंकल्पाची झाली आहे. या अर्थसंकल्पात किती विश्वास ठेवायचा अशी शंका येते. कर्जाचं प्रमाण वाढलं तरी त्या कर्जातून विकासात्मक खर्च किती होतो ते पहायला हवं. आधी महसुलाचा खर्च दाखवयचा आणि नंतर पुरवठा आणि मागणी करायची. हा राज्यसरकारचा मनमानी कारभार चालू आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
Speaking on #MaharashtraBudget discussion in #MaharashtraAssembly. #BudgetSession
विधानसभा : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत माझे मनोगत…
(सोमवार, दि. 14 मार्च 2022) https://t.co/RYgvScHMp0— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2022