मुंबई : राज्यसभेसाठी एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची घोषणा खा. इम्तियाज जलील यांनी ट्वीट करुन दिली आहे. महाविकास आघाडींला पाठिंबा देताना काही मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या विचारांशी आमचे मतभेद कायम राहतील असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, भाजपचा पराभव करण्यासाठी आमचा पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय/वैचारिक मतभेद मात्र कायम राहतील.
भाजपा को हराने के लिए हमारी पार्टी @aimim_national ने महाराष्ट्र में राज्यसभा चुनाव में महा विकास अघाड़ी (एमवीए) को वोट देने का फैसला किया है। हालांकि हमारे राजनीतिक/वैचारिक मतभेद @ShivSena के साथ जारी रहेंगे जो @INCIndia और @Maha_speaks_ncp के साथ MVA में भागीदार है।
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 10, 2022
धुळे आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासासाठी आम्ही काही अटकी घातल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावे अशी मागणी केली. तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्याचीही मागणी केली असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे एमआयएमची ही दोन मते काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना मिळणार हे स्पष्ट झालं आहे. जर एमआयएमची दोन मते काँग्रेसला मिळणार असतील तर काँग्रेसची दोन मते ही शिवसेना उमेदवाराला दिली जातील अशा प्रकारची रणनिती आखली जाईल असं दिसत आहे.