राज्यात ‘या’ तारखेपासून सर्व शाळा सुरु होणार

मुंबई : राज्यातील शाळा कधीपासून सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांसमोर पश्न होता. मात्र आता याबाबात शिक्षण विभागाने राज्यातील शाळा १३ जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचं शिक्षण आयुक्तांनी पत्र काढत सांगितलं आहे. विदर्भातील शाळा मात्र २७ जूनपासून सुरू होणार आहेत.

राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. आदेशात शैक्षणिक सत्र २०२२- २३  सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.  शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र १३ जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा २७ जून पासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी १५ जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी २७ जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा जरी १३ जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं आहे. १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंघाने प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलं आहे.

Share