अखेर प्रतीक्षा संपली, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : राज्यातील इयत्ता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर कऱण्यात आली आहे. उद्या ८ जून रोजी बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून हा निकाल जाहीर करण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे www.maharesult.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याना आपला निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

Share