नवी दिल्ली : यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार होणार आहे. अशी माहिती संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. प्रल्हाद जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान २३ दिवसांत १७ बैठका होणार आहेत.
Winter Session of Parliament to begin on December 7
Read @ANI Story | https://t.co/VMIxzps0oN#Parliament #India #WinterSession pic.twitter.com/tL9WswBXZ7
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2022
देशाच्या अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर बाबींवर चर्चेची अपेक्षा आहे. या दरम्यान सर्वपक्षीय संसदीय सदस्यांकडून विधायक चर्चेची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे पहिलेच अधिवेशन असेल जेव्हा उपाध्यक्ष जगदीप धनखर राज्यसभेचे कामकाज चालवतील. सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करत असताना, विरोधक अनेक विषयांवर चर्चेची मागणी करणार आहेत.