सचिन तेंडुलकरला गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखल जात त्याने वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आज त्याने ५० व्या वर्षात पदार्पण केल आहे. २४ एप्रिल १९७३ मध्ये त्याचा जन्म मुंबईत झाला.वयाच्या 12 व्या वर्षी सचिन त्याच्या शाळेकडून खेळत असताना शतक पूर्ण केल होत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, विक्रमवीर, मास्टर असलेल्या सचिन तेंडुकरच्या नावावर आज क्रिकेटजगतातले अनेक मोठमोठे विक्रम आहेत.
1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धपहिला सामना सचिनने खेळून त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी जगावर वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या पाकिस्तानी गोलंदाजांचा बोलबाला होता. त्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात वकारचा एक चेंडू सचिनच्या चेहऱ्यावर लागला. त्यावेळी त्याच तोंड रक्ताने माखल होत. आता तो फलंदाजी करू शकणार नाही, असे लोकांना वाटू लागले. पण सचिनने तो सामना खेळला. सचिनचा हा जोश पाहून त्याच्यासोबत फलंदाजी करणारे नवज्योत सिद्धूही चकित झाले.
त्यानंतर सचिनने रणजी करंडक, दिलीप करंडक आणि इराणी करंडक या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. पुढच्याच वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पदार्पणाच्या एका वर्षानंतर,त्यांनी इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पहिले कसोटी शतक पूर्ण केले. सचिनने 2000 मध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि असे करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले आहेत.
सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनने 200 कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत. सचिन एक टी-20 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 10 धावा केल्या होत्या.
आज सचिन तेंडुलकर त्याच्या बॅटिंग साठी ओळखला जातो पण सुरवातीला सचिनला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. गोलंदाजी शिकण्यासाठी तो प्रशिक्षण शिबिरातही गेला होता, जिथे त्याला प्रशिक्षक डेनिस लिली यांनी आपले संपूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रित करण्यास सांगितले होते. यानंतर त्याने आपले पूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रित केले आणि आज तो क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो.
सचिनने १४ आणि १६ नोव्हेंबर २०१ ३ रोजी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता. या सामन्यात ७४ धावा करून तो बाद झाला होता.