‘पावनखिंड’चा ट्रेलर रिलीज, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबईः  प्रेक्षकांचे भरभरून प्रेम ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांना मिळाले होते. मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथा मांडल्या जात आहेत. आता यात आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मागील बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना अक्षरशः अंगावर काटा येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

https://www.instagram.com/p/CZyRiKZNU5N/?utm_source=ig_web_copy_link

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातील अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव, असे म्हटले आहे. चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या १८ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

Share