गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये; राऊतांचं केसरकरांना प्रत्युत्तर

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही. असं विधान शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज असून, शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपात जातील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार आम्हाला करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे, जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. दीपक केसरकरांनी जे विधान केलं आहे, त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाले असं दिसतं आहे. अब्दुल सत्तार यांनीही म्हटलंय की माझ्या गटातले लोकं माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, हा गटही टीकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करतील. तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.

Share