अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा; नरेंद्र पवारांची मागणी

पुणे : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवारांना भारतात राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांची रवानगी पाकिस्तानात करा अशी मागणी नरेंद्र पवार यांनी केली आहे.

माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की,महाराष्ट्रातील नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत.ज्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज माहीत नाही. तसेच ज्यांना संभाजी महाराज धर्मवीर होते हे माहीत नाही त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.त्यामुळे खरंच अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

अजित पवारांनी जे विधान केलं, त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून द्यायला हवं. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका नरेंद्र पवार यांनी केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा असे अजित पवार म्हणाले.

Share