अहमदाबाद- भारतरत्न ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाकडूनही लता दीदींना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रविवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे, यावेळी लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
The Indian Cricket Team is wearing black armbands today to pay their respects to Bharat Ratna Lata Mangeshkar ji who left for her heavenly abode on Sunday morning. The queen of melody, Lata didi loved cricket, always supported the game and backed Team India. pic.twitter.com/NRTyeKZUDc
— BCCI (@BCCI) February 6, 2022
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया आपल्या दंडावर काळ्या रंगाच्या फीत लावून लता दादींना श्रद्धांजली वाहणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली असून गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. यावेळी राष्ट्रध्वजही अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.