आंतरराष्ट्रीय- युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाचव्यांदा घवघवीत यश संपादन केले आहे. अँटिग्वा येथे रंगलेल्या या सामन्यात भारताने ४ गडी राखून इंग्लंडला धूळ चारली. आणि भारताचे नाव पाचव्यांदा विश्वचषकावर कोरले गेले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦 🏆 🙌 👏 🔝#BoysInBlue | #U19CWC | #INDvENG
Scorecard ▶️ https://t.co/p6jf1AXpsy pic.twitter.com/SajoSVPvas
— BCCI (@BCCI) February 5, 2022
भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ १८९ धावांपर्यंत मजल गाठू शकले. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची चांगलीच झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेत इंग्लंडच्या संघाला पळता भुई करत चांगलाच घाम फोडला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय आपल्या खिशात घातला . यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. तर राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे . तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
भारत : हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद (उपकर्णधार), यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना, राजवर्धन हेंगरगेकर, विकी ओस्तवाल आणि रवी कुमार.
इंग्लंड : जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रिस्ट (कर्णधार), जेम्स रियू, विल्यम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन, थॉमस ऍस्पिनवॉल, जेम्स सेल्स, जोशुआ बॉयडेन.