युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारत पाचव्यांदा बनला जगज्जेता..!

आंतरराष्ट्रीय- युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाचव्यांदा घवघवीत यश संपादन केले आहे. अँटिग्वा येथे रंगलेल्या या सामन्यात भारताने ४ गडी राखून इंग्लंडला धूळ चारली. आणि भारताचे नाव पाचव्यांदा विश्वचषकावर कोरले गेले.  या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ १८९ धावांपर्यंत मजल गाठू शकले. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची चांगलीच झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेत इंग्लंडच्या संघाला पळता भुई करत चांगलाच घाम फोडला.  प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय आपल्या खिशात घातला . यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. तर राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे . तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

भारत : हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद (उपकर्णधार), यश धुल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, कौशल तांबे, दिनेश बाना, राजवर्धन हेंगरगेकर, विकी ओस्तवाल आणि रवी कुमार.

इंग्लंड : जॉर्ज थॉमस, जेकब बेथेल, टॉम प्रिस्ट (कर्णधार), जेम्स रियू, विल्यम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन, थॉमस ऍस्पिनवॉल, जेम्स सेल्स, जोशुआ बॉयडेन.

Share