उत्तर प्रदेश परिवर्तन की ओर..,और एक विकेट गीर गयी- संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्मा यांचा राजीनामा आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. वर्मा उत्तरप्रदेशमध्ये मासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात. वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या ७ वर पोहोचली असून भाजपसाठी ही मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1481500776434307075?s=20
मुकेश वर्मा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे. त्यांनी भाजपच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे. मागील पाच वर्षात दलित, मागास वर्गातील नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिलं गेलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्य़ोजक आणि व्यापाऱ्यांचीही घोर उपेक्षा झाली. त्यामुळे कुटनीतीचे धोरण अवलंबल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वर्मा यांनी सांगितले. तसेच स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेते आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, असेदेखील वर्मा यांनी आपल्या राजीनामापत्रात सांगितले आहे.