UP Election 2022: बसपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लखनऊ:  उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती बसपाने पहिल्या टप्प्यातील ५८ पैकी ५३ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय.

उत्तर प्रदेशातील २०२२ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा बहुजन समाज पक्ष सत्तेत वापसी करेल, असा दावा केला. यूपीत बसपाचे सरकार बनेल. आमचे सरकार प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मायावतींनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून निवडणुकीसाठी ५३ उमेदवारांची नावे जाहीर केली. उर्वरित ५ जागांवरही एक-दोन दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील असे त्यांनी म्हटलेय.

इतर पक्ष युती करून बसपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, मला खात्री आहे की जनता आम्हालाच पुन्हा सत्तेत आणेल. यावेळीही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करू, असे पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलेय. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच आमच्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणेल. यावेळीही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करू”, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केलाय.

जनतेनं विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये. जातीवादी आणि बसपा विरोधी पक्षांपासून दूर राहा. मी लोकसभेत चार वेळा, राज्यसभेत तीनदा, विधानसभेत दोनदा आणि दोनदा आमदार झाले. कांशीराम यांच्यानंतर पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळं मी निवडणूक लढवणार नाही. सरकार स्थापन झाल्यास मी विधान परिषदेच्या माध्यमातून सरकारचे नेतृत्व करेल, असेही मायावती यांनी म्हटलेय.

Share