गोव्यात उत्पल पर्रिकर यांच्यावरून राजकारण तापलं

गोवा-  केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका ८ जानेवारी रोजी जाहीर केल्या. त्यासाठी आधीपासूनच प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणी सुरु झाली होती.  या पाच राज्यांपैकी प्रामुख्याने गोवा , उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यांवर संपूर्ण देशाच लक्ष लागून आहे.

गोव्यात भाजपला परत एकदा सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. त्यानूसार गोव्यातील उमेदवारांची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली . यंदाच्या गोव्यातील निवडणूकीत आप  आणि तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदा उडी मारली आहे.  भाजपच्या उमेदवारी यादीमूळे गोव्यातील राजकारणाची देशभर चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेच कारण ठरले आहेत उत्पल पर्रिकर. उत्प पर्रिकर हे देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत.

भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी दिली नसल्याने या वादाला सुरुवात झाली. यावर उत्पल यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरून भाजपवर विरोधी पक्षांनी जोरदार टिका केली आहे. तसेच शिवसेना नेते खासदार संजय़ राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Share