UP Election 2022 : भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली :   भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे.  भाजपने पहिल्या टप्यातील ५८ पैकी ५७ जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्पातील ५५ पैकी ४८ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर विधानसभा मतंदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. यादीत १०७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर  ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.  तसेच २१ नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये तरुण, महिला आणि समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा १० फेब्रुवारीला असणार आहे. त्यानंतर १४ , २०, २३, २७फेब्रुवारी त्यानंतर ३ आणि ७ मार्च अशी सात टप्प्यांत मतदान प्रकिर्या पार पडणार आहे. तर १०  मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

 

 

Share