ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली.

शिरीष याडगीकर म्हणाले की, अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत आणि हात-पाय हलवत आहेत. पुढील ४८तासांत त्यांचं व्हेंटिलेटर सपोर्ट निघू शकेल. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे. अशी माहिती शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांच्या निधनाच्या अफवा उठलेल्या असताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या साऱ्याला पूर्णविराम दिला. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे गोखलेंच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देणारं मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आलं त्यातून ही माहिती समोर आली. सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Share