ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मुंबई : मराठीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे. मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म १ जानेवारी १९७० झाला. हे एक मराठी अभिनेते होते. प्रदीप पटवर्धन यांनी प्रामुख्याने मराठी सिनेमात काम केलं. २०१९ ला प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.

प्रदीप पटवर्धन यांचे सिनेमे

एक फुल चार हाफ
डान्स पार्टी
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
गोळा बेरीज
बॉम्बे वेल्वेट
पोलीस लाइन
एक दोन तीन चार
परीस
थॅक यू विठ्ठला
चिरनेर

Share