ज्येष्ठ गायिका रंगकर्मी किर्ती शिलेदार यांच निधन

पुणेः ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे आज पाहाटे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता.

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, त्यांची एकमताने निवड झाली होती. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

किर्ती शिलेदार यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

  • नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान -१९९९
  • महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार- २००९
  • पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार- २००६

 

Share