Election 2022 :उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यांमधील ५९ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर पंजाबमध्ये सर्वच ११७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. तसेच तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन के तीसरे चरण में जो 59 विधानसभा क्षेत्रों में है, इसमें सुबह 7 बजे से 9 बजे के बीच कुल 8.15% मतदान की सूचना मिली है। सभी जगह चुनाव शांतिपूर्ण चल रहा है: अपर मुख्य निर्वाचन अधिकारी बी.डी. राम तिवारी, लखनऊ pic.twitter.com/SB4ZAbzKRZ
— ANI_HindiNews (@AHindinews) February 20, 2022
उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात २ कोटी १५ लाख ७५ हजार ४३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ कोटी १६ लाख १२ हजार ०१० पुरुष मतादर तर ९९ लाख ६२ हजार ३२४ महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ६२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजप-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी १ हजार ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये २.१४ कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.