बारावीचे दोन पेपर लांबणीवर, नेमक कारण काय?

पुणेः उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी घेण्यात येणाऱ्या १२ वी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये थोड बदल करण्यात आले आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र आता वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून बारावीचे ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर हे आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहे. दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनात परीक्षा का पुढे ढकलण्यात आला यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. २३ फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे .

५ मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर, ७ मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता.

बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन दिवसाच्या पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे. तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

Share