ईडी म्हणजे काय २ हजारांची नोट वाटली का?, उधार द्यायला

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील ,असेही राऊत यांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या विधानावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी जोरदार टिका केली आहे.

निलेश राणे आपल्या ट्टिट मध्ये म्हणतात, ”संजय राऊत दोन दिवसासाठी ईडी मागत आहेत. जसं 2 हजार उधार मागत्यात तसं. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं,” अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टिका केली आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने डावललं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंबाबत चिंता व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण या महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी मुंडे यांचा मोठा हात आहे. असेही संजय राऊत म्हणाले.

Share