तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास – काॅँग्रेस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. विविध प्रकल्पांचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात प्रथम पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर मोदींनी गरवारे मेट्रो स्टेशवरुन पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान मोदींनी गरवारे स्टेशन ते आनंदनगर कोथरुड असा प्रवास केला. याप्रवासात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.  मात्र, आता त्यांच्या याच कृतीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामधील वाहतूक मार्गातील प्रत्येक दुकानं बंद, हॉटेल्स देखील दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आल्यावरही टीका करण्यात आली आहे. एकीकडे शाळा उघडी नसताना मुलांना शाळेत पाठवलं जात आहे तर दुसरीकडे दुकाने बंद करायला लावली जात आहेत. मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नसतानाही ही इंव्हेंटबाजी कशासाठी? असा सवाल विचारण्यात येत आहे.

मोदी दुसरे पंतप्रधान

पुणे महापालिकेत येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापुर्वी देशाचे पहिले पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू पुणे महापालिकेत आले होते. त्यानंतर आता मोदींच्या रूपाने हा योग जुळून आला आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला दुसरीकडे वादाची किनार आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्याचा निषेध केला आहे.

Share