जगभरातील कित्येक लोक सकाळच्या नाश्त्याला अंड खाणे पसंत करतात. कारण अंडे स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने आपल्या शरीरासाठी लाभदायक असते. दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते.
अंड हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११% तर स्त्रियांची १४% प्रोटिन्सची गरज भागते. एका अंड्यामधून ६ ग्रॅम प्रोटिन्स मिळतात
अंड खाण्याचे फायदे
- अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.
- अंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो.
- अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त.
- अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२
- अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.
- अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.