विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी – तृप्ती देसाई

मुंबई : राज्यात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. राज्यातील विविध भागात सकाळापासून महिला वडाची पूजा करत आहेत. मात्र, विधवा महिलांसाठी काही विशेष सण सभांरभ नसतो. या पार्श्वभूमीवर विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी असे मत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलं आहे.

वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करावा. जेणेकरुन पर्यावरणाचं देखील आपल्याकडून संवर्धन होईल, त्यामुळे वटपोर्णिमेला झाडाची पुजा करण्यापेक्षा झाड लावण्याचा सल्ला तृप्ती देसाईंनी दिला आहे.

https://www.facebook.com/100002397939695/videos/394117002675389/

जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, महिला उच्चपदी काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

Share