हा अपमान खपवून घेणार नाही, बिनशर्त माफी मागा – शालिनी ठाकरे

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं. त्यांच्या टीकेनंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. . राजकीय वर्तुळातून अनेक महिला नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

राजकारणातील स्त्रियांबद्दल अशोभनीय, घाणेरडी भाषा वापरण्याची नवीन फॅशन महाराष्ट्रात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. राजकारणातील स्त्रिया हा अपमान खपवून घेणार नाहीत. सत्तार यांनी तत्काळ बिनशर्त माफी मागावी. असे ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत सत्तार यांनी बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे.

दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत.

Share