नाशिक : लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले आहे अशा भावना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
मंत्री छगन भूजबळ आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील.
लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले आहे.लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्याच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध pic.twitter.com/ZwrGfPpujq
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 6, 2022