योगी आदित्यनाथ यांचा २५ मार्च रोजी शपथविधी; केंद्रातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती

उत्तरप्रदेश- योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी  क्रिकेट स्टेडियममध्ये २५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा पार पडणार आहे. स्टेडियममध्ये ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांसह इतर प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Share