तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका

नागपुर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला आहे. मात्र त्यामध्ये बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी या शहरांसह सर्व गावांचा उल्लेख करावा ही ठरावात असलेली चूक विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान या ठरावात व्याकरण चुका असून चुकीच्या पद्धतीने ठराव मांडला जाऊ नये यासाठी तो व्यवस्थित दुरुस्त करून सभागृहात मांडावा अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

सीमाभाग ठरावात अनेक चुका आहेत. अध्यक्षमहोदय आपण इंग्रजी माध्यमांचे आहेत. यात अनेक वाक्यरचना चुकीच्या आहेत. याचा संदर्भ उद्या कोर्टातही उपस्थित केला जाऊ शकतो. मराठीची तोडमोड करुन हा ठराव नको. यात सुधारणा करण्यात यावा, असे अजित पवार म्हणाले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सकाळी हा ठराव दाखवला होता. यात काही व्याकरणाच्या चुका आहेत. त्या सुधारल्या जातील. मात्र व्याकरणाच्या चुकांचा न्यायालयात काही परिणाम होत नाही.

Share