मुंबई : राज्यसभेच्या राज्यातील ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची ४३, शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना ४४, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे ४८ मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यावरच मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, “राज्यसभेचे निकाल पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की, “उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात…….!!!!” असे पण संभाजीनगर सभेत सत्यच बोलला होतात…ते आज पुन्हा एकदा सर्वांना पटले असेलच….!!!!” असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभेचे निकाल पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की, "उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात…….!!!!"
असे पण संभाजीनगर सभेत सत्यच बोलला होतात…ते आज पुन्हा एकदा सर्वांना पटले असेलच….!!!!#राज्यसभानिवडणूक #MPLocalElections #राज्यसभा_निवडणूक— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 11, 2022
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार यांचा विजय होणारच, असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. मात्र मतमोजणीनंतर संजय पवार यांना ३८ मतं तर धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला.