दूध डेअरीच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

माधव पिटले/ निलंगा : दूध डेअरीच्या जुन्या इमारतीत खिडकीला दोरी बांधून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना निलंगा शहरातील लातूर- बिदर रोडवर घडली. दिलीप शेषराव थोरमोटे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

निलंगा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले दिलीप थोरमोटे हे निलंगा येथील एका खासगी वाहनावर चालक म्हणून गत १५ वर्षांपासून काम करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता लातूर-बिदर महामार्गावर असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जुन्या इमारतीत खिडकीला कापडी दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर धानोरा येथे शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार सुधीर शिंदे करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ असा परिवार आहे.

Share