मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतना कौशल्या विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फक राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या मिळवून देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छून उमेदवार आणि विविध कंपन्या, काॅर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्याक येतो, असेही मलिक यांनी सांगितले.
विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२१ मध्ये राज्यात २ लाख १९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तसेच २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घाण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वबपार्टल सुरु केले आहे. या वेबपार्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनूभव आदी माहिसीसह नोंदणी हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमदेवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९४ हजार ३४५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
ऑनलाईन रोजगार मेळावे, https://t.co/bMuFxlIkWN हे पोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये जानेवारी २०२२ मध्ये ७,७१३ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांनी दिली. pic.twitter.com/ISe9x0G4DO
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 11, 2022
जानेवारी २०२२ मध्ये विभागाकडे २५ हजार ९८१इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ८८८, नाशिक विभागात ५हजार १५२, पुणे विभागात ६ हजार ५५६, औरंगाबाद विभागात ४ हजार ७११, अमरावती विभागात १ हजार ५४० तर नागपूर विभागात २ हजार १३४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
कुठे रजिस्टर कराल?
जानेवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ७ हजार ७१३ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २ हजार ८४७, नाशिक विभागात २ हजार ७९५, पुणे विभागात ५३५, औरंगाबाद विभागात १ हजार २८५, अमरावती विभागात २१३तर नागपूर विभागात ३८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले. नोकरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.