जळालेले ट्रान्सफार्मर बदलून द्या – आ. प्रशांत बंब

औरंगाबाद- जळालेले ट्रान्सफाॅर्मर बदलून द्या अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. एकीकडे पाण्याआभावी हातचं आलेल पिक जाण्याच्या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर दूसरीकडे महावितरण रोहित्र्यामुळे शेतकऱ्यांना अडवून पाहत आहेत. यातच आमदार बंब यांनी थेट महावितरण गोदाम गाठत ,महावितरमाचा सावळा गोंधळ उघकीस आणला.

याप्रकरणी औरंगाबादच्या महावितरणाच्या गोदामाच्या बाहेर पत्रकार परिषद घेत बंब म्हणाले की, रब्बीच हंगाम सुरू असून अनेक ट्रान्सफार्मर जळत आहेत . त्यामुळे बिल भरो अथवा न भरो तो ट्रान्सफार्मर ४८ तासात बदलून दिला पाहिजे असा कायदा आहे. मात्र एक बिल भरून सुद्धा जळालेले ट्रान्सफार्मर तीन-तीन हप्ते बदलून मिळत नाही. अधीक कालावधी म्हणजे दीड महिने महावितरण हे ट्रान्सफाॅर्मर बदलून देत नाहीय. त्यामुळे मी स्वतः महावितरणाच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली असता शेकडो ट्रान्सफार्मर धूळखात पडले असल्याचं समोर आलं आहे,असे  बंब म्हणाले.

तर पुढे बोलताना बंब म्हणाले की, महावितरणच्या गोदामामध्ये तब्बल चार-पाच वर्षांपूर्वीचे ट्रान्सफार्मर पडून आहेत. अनेकांची गॅरंटी संपली आहे, तर काहींची दोन वर्षे-तीन वर्षे अशी गॅरंटी शिल्लक आहे. त्यामुळे जर गोदामात शेकडो ट्रान्सफार्मर पडून असतानाही ते शेतकऱ्यांना का दिले जात नाही, शेतकऱ्यांची अडवणूक कशासाठी केली जातेय असा प्रश्न बंब यांनी उपस्थित केला आहे. तसेच या बद्दलचा प्रस्ताव पाठवून सुध्दा कोणतीही कारवाई केली जात नसल्याने बंब यांनी खंत व्यक्त केली आहे.

Share