अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात होणार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

 

मुंबई- राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात होणार आहे. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडुन करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच खबरदारी घेत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन कालावधीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनिक भत्त्यांमध्ये वाढ होण्याबाबतचा तारांकित प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता.

Share