गृहकर्ज महाग होऊ शकते,तीन प्रकारे ओझे कमी करू शकता.

गृहकर्ज व्याजदर २०१९पासून कमी होत आहेत रिझर्व बँकेने २०२० पासून रेपो दर ४ टक्क्यांवर  स्थिरावला आहे आतापर्यंत त्यात एकदाही वाढ झालेली नाही. त्यामुळे पात्र असल्यास ६.४० टक्के दराने गृहकर्ज मिळू शकते .
डझनभर बँका आणि वित्त कंपन्या ७ टक्‍क्‍यांपेक्षा कमी दराने कर्ज देत आहेत. मात्र महागाई वाढतच आहे. अशा स्थितीत कर्ज आतासारखी स्वस्त होणार नाहीत. यंदा धोरणात्मक व्याजदर वाढतील असे म्हटल जातय , त्यामुळे गृहकर्ज ही महाग होणार आहे .

गृह कर्ज किती महाग होईल ?
समजा तुम्ही ६.५०% व्याजदराने वीस वर्षांसाठी गृहकर्ज घेतले आहे. या कर्जाच्या
प्रत्येकी १ लाख रुपयांच्या मूळ रकमेवर तुम्हाला सुमारे ७९हजार रूपये मोजावे लागतील.
कर्जाचा व्याजदर ०.२५ टक्के ते ६.७५ टक्के वाढल्यास तुमचे व्याज सुमारे ८२हजार रुपये असेल, जर दर ७ टक्के झाला तर व्याज दर ८६हजार रुपये होईल. याचा अर्थ स्पष्टच आहे की, व्याजदरात थोडीशी वाढ केली तरी ,व्याजात हजारो रुपयांचा फरक पडत असतो.

ईएमआय किती वाढेल ?
साधारणपणे दरवाढीमुळे तुमच्या कर्जाचा कालावधी हा वाढतो आणि ईएमआय स्थिर राहतो.
उदाहरणार्थ जर तुम्ही ६.७५ टक्के व्याजाने वीस वर्षांसाठी १ लाख रुपये कर्ज घेतले असेल तर ईएमआय ७६०रुपये असेल. परंतु जर दर ७टक्के झाला आणि ईएमआय सारखाच राहिला, तर २० वर्षं एवजी तुम्हाला, २०वर्ष १०महिन्यांसाठी तो भरावा लागेल.पण तुम्ही कर्ज घेतांनाच ईएमआय बदलण्याचा निर्णय निवडला असेल तर दर वाढल्याने तुमचं ईएमआय वाढेल. आणि तो ७७५रुपये इतका होईल.
गृहकर्जाचे व्याजदर वाढल्यानंतर तुमच्याकडे तीन पर्याय आहेत ज्यामुळे आपण कर्ज लवकर फेडु शकतो.

री फायनान्स करा
कर्जाचा दर आणि बाजार दर यांच्यात मोठा फरक असेल
(०.२५ ते ०.५०) तेव्हा होम लोनव रिफायनान्स म्हणजेच शिल्लक हस्तांतर हा पर्याय निवडला जातो. तुमचे कर्ज ७.५०टक्के आहे आणि कर्ज ७ टक्क्यांवर बाजारात उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, शिल्लक हस्तांतर फायदेशीर ठरत जर तुमच्या कर्जाला वीस वर्षे शिल्लक असतील, तर प्रत्येकी १ लाख रुपयांच्या कर्ज मागे तुमची सुमारे ७,४०० रुपयांची बचत होते. कर्जाची मुदत अर्ध्याहून अधिक शिल्लक राहिल्यास हस्तांतर योग्य असेल . प्रक्रिया शुल्क आणि  एमओडीशुल्का सारखे हस्तांतर खर्चही असतात.

ईएमआय वाढवा
तुमचे उत्पन्न कालांतराने वाढले असेल पण ईएमआय जर स्थिर असेल तर तुम्ही स्वच्छेने ईएमआय वाढवू शकता. अतिरिक्त ईएमआय कर्जाची मूळ रक्कम कमी करतात. त्यामुळे तुमचे कर्ज लवकर फेडण्यासाठी होऊ शकतात ,कर्जाचा कालावधी कमी होऊ लागतो.
ही पद्धत लहान प्री पेमेंट सारखेच आहे उदाहरणार्थ ७ टक्के व्याजाने २०वर्षांसाठी, 30 लाख रुपये कर्जासाठी ईएमआय सुमारे २३हजार रुपये असेल आणि जर तुम्ही दुसऱ्या वर्षीपासून ते २६हजार रुपये केले तर ईएमआय कमी होतील .व्याजही २५.९६ लाखांवरून २५.१० लाखांवर येईल.

प्री पेमेंट करा
व्याजदरात वाढ झाल्यास तुम्ही ईएमआय वाढवायचा नसेल तर तुमच्याकडे तिसरा पर्याय आहे तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी पेमेंट करू शकता आणि कर्ज मुद्दल वजा करू शकता. बऱ्याच बँका आणि फायनान्स कंपन्या तुम्हाला ईएमआय रकमेच्या किमान एक ते दोन पट प्री पेमेंट करू इच्छितात. उदाहरणार्थ. जर तुम्ही ६०टक्के दराने वीस वर्षांसाठी ३०लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, आणि सुरुवातीला ५०हजार रुपयांची प्री पेमेंट केली असेल तर सात ईएमआय कमी होतील आणि व्याजदर २५.९६ लाखांवरून घटून २४.४८ लाखांवर येईल.

तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि कर्जाचा व्याजदर वाढीमुळे फारसा फरक पडत नसेल तर काहीही करण्याची गरज नाही. दरवाढीमुळे काही ईएमआय जास्त असेल ,नंतर भविष्यात दर कमी केल्यास ईएमआय परत कमी होईल, परंतु व्याजदर वाढल्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन बिघडत असेल तर तुम्ही ही पावले नक्की उचलू शकतात.

Share