फ्रान्समध्ये परत एकदा मॅक्रॉन सरकार ; मरीन ले पेन याचा पराभव

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन याचा पराभव केला. आयफेल टॉवरजवळील चॅम्प डी मार्स पार्कमधील एका विशाल स्क्रीनवर निकाल दिसू लागल्याने त्याचे समर्थक आनंदाने उफाळून आले. बर्लिन, ब्रुसेल्स, लंडनच्या नेत्यांनी राष्ट्रवादी, युरोसेप्टिक इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विजयाचे स्वागत केले आहे.

फ्रेंचमध्ये झालेल्या निवडणुकांचा काल निकाल लागला असून या निवडणुकातं ले पेन यांचा पराभव झाला आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ५७.८ टक्के मते मिळाली असल्याचं गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले. त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, पेन यांना दूर ठेवण्यासाठी लोकांनी मला मतदान केले आहे. तसेच सध्या फ्रेंचमधील लोकांचे जीवनमान घसरत असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. फक्त माझ्या कल्पनांना पाठिंबा द्यायचा म्हणून नाही तर अतिऊजव्या विचारांना दूर ठेवण्यासाठी लोकांनी मला मतदान केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी राहीन असं ते म्हणाले.

इमॅन्युएल मॅक्रॉन दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांनी नॅशनल रॅली पार्टीच्या उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरिन ले पेन यांचा पराभव केला. मतदानाच्या शेवटच्या फेरीत, मॅक्रॉन यांना ५८.२ टक्के आणि ले पेन यांना४१.८ टक्के मते मिळाली. कोरोनाला चांगल्या प्रकारे हाताळल्यामुळे लोक त्यांना पसंत करत होते.२००२ पासून फ्रान्समध्ये कोणताही नेता पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला नाही, परंतु मॅक्रॉन यांनी ही परंपरा मोडली. त्यांच्या या विजयानंतर जगभरातून त्यांच अभिनंदन केल जात आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट केले – फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी तुमची पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन. आपल्या देशांसाठी तसेच जगासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर मी एकत्र काम करत राहण्यास उत्सुक आहे.

जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी मॅक्रॉनसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “आम्ही एकमेकांना सहकार्य करत राहू याचा मला आनंद आहे.” त्याच वेळी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले – मी कॅनडा आणि फ्रान्ससाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.

Share