ब्राम्हण विरोधाची भडास निमित्त आहेत रामदास

राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर राज्यसभेवर जाणार आहेत. तर या स्पर्धेत एबीपीचे संपादक राजीव खांडेकर यांचा उल्लेख करत, असे अनेक नावांच्या स्पर्धा सध्या सुरु आहेत. पण कोण होणार राज्यसभेचा खासदार हा प्रश्न आहे? आणि याचं उत्तर देखील स्पष्ट आहे की या दोघांपैकी कोणीही खासदार होणार नाहीत, हेही तितकचं काचे सारख स्पष्ट आहे. कारण राष्ट्रवादीकडून शरद पवार कोण्या ब्राम्हण समाजाच्या व्यक्तीला राज्य सभेवर पाठवतिल हे मान्य करणं कठीण आहे. पुरोगामी ज्या ब्राम्हणांनी राष्ट्रावादीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला , त्या व्यक्तींना तो ब्राम्हण असल्याच सांगत डावलण्यात आलं आहे.

शरद पवारांना ब्राम्हण समाजाचा राग आहे , तिटकार आहे, की तिरस्कार आहे ,की ते उपयोगाचे वाटत नाहीत. नेमक कारण काय याचा विचार केला पाहिजे. पवारांचे ब्राम्हण सामाजा बद्दलचे मत आता सारखे आधीही तेच होते का? पवारांनी सावरकरांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात तोंड भरून कौतुक करत त्यांना आद्य क्रांतीकारक म्हंटल आहे. एवढ्यावर थांबून चालणार नाही  त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा  जाहीर सत्कार देखील केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा पुतळा पवारांनीच उभा केला आहे.शरद पवारांच्या दिर्घकाळ वर्चस्व असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या अनेक संग्रहालयामध्ये दादोजी कोंडदेवांचा पुतळा स्थापन करणारे शरद पवारच आहेत.

राम  गणेश गडकरींचा पुतळा उभारणारे पवारच होते. तर, दादोजी कोंडदेव यांच्या नावाने दिला जाणारा क्रिडा पुरस्कार पवारांनीच दिला आहे. शरद पवार याआधी या सर्व लोकांना समर्थन देत होते मग आता अचानक भूमिका का बदली ? आद्यक्रांतीकारक आता शरद पवारांना माफीवार का वाटू लागले ? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख ब.म.पुरंदरे असा का करु लागले ?  दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवा अशी मागणी करणाऱ्या लोकांच्या मागे शरद पवार समर्थ पणे का उभे राहिले ? दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद करण्यात आला. या सगळ्या गोष्टींची उत्तरे शोधने गरजेचे आहे. आणि याचं उत्तर देखील तितकच स्पष्ट आहे. की, ही सगळी व्यक्ती ब्राम्हण होती म्हणून आता त्यांना विरोध होत आहे.

समर्थ रामदासांचा पुतळा उभारणारे शरद पवार पुढे इतिहासाच्या विलोकणानंतर रामदासांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही हे स्पष्टपणे सांगू लागले. कदाचित बदलत्या इैतिहासीक संबंधानूसार किंवा इतिहासानूसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोघांची भेट झाली नाही. आणि भेट झाली नसल्यामुळे ते गुरु होवू शकत नाहीत. असं सिध्द झालं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम गुरु होते हे चालत पण रामदास स्वामी गुरु होते हे चालत नाही. दादोजी कोंडदेवांचा आणि शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नाही हे नव्याने मांडल जातं आहे आणि त्याला मान्यता देखील आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात काम करणारे निष्ठावंत अणाजी पंतांचा दोन राजपुत्रांपैकी एका राजपुत्रावर निष्ठा होती. म्हणून त्यांना शिव द्रोही ठरवल्या गेलं , हे एक विशेष आहे. समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे  गुरु होते की नव्हते यावर असलेल्या वादात टिपण्णी करणे शक्य नाही . पण समर्थ रामदास स्वामी हे शिवभक्त होते हे मात्र नक्की आहे.  समर्थ रामदासांची शिवाजी महाराजांवरील काव्य पाहिली तर, स्वामींची महाराजांवरील भक्ती , आणि महाराजांना तेे श्रीमंतयोगी म्हणत असत हे त्या काव्य संग्रहातून लक्षात येतं. त्यामुळे रामदासांचे अस्तित्व नाकारण्याचा उद्योग होतं आहे हे फार मोठ दुर्दैव आहे.

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी मांडलेला इतिहास हा शरद पवारांच्या बाजूने मांडलेला आहे. यात ब्राम्हण कशे चुकिचे आहेत हे दाखवण्यात आलं आहे. मात्र जावळीच्या मोरेंचा इतिहास धाकण्यात आला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा इतिहास फार मोठ्या कौतुकाने सांगितला जातो मात्र रांज्याच्या पाटलांचा उल्लेख मात्र इतिहासात लपवला गेला.  ब्राम्हण शिवद्रोही होते हे सांगण्याचा पवारांच्या गटाचा आणि ब्रिगेडी विचारेचा हा एक कलमी कार्यक्रम सुुरु आहे. रामदास स्वामी महाराजांचे गुरु नव्हते पण ते एक शिवभक्त होते हे नाकारता येणार नाही.

या सर्व प्रकरणातून शरद पवारांनी आपण मराठा समाजाचे नेते आहोत. ब्राम्हण समाजाचा व्देष करत त्यांनी महाराष्ट्रात जातीय तिढा निर्माण केला. ब्राम्हण दूर केल्यावरती त्यांचा विरोधातील समाज आपल्या जवळ येतील आणि तो कायम राहावा, यासाठी ब्राम्हणांचा तिरस्कार केला जात आहे. शिवरायांच्या कालखंडापासून असा जातीय व्देष कुठेही नव्हता पण तो पहायला मिळत आहे. पवारांनी राजकराणात आपल्या भूमिका बदलत्या ठेवल्या  आणि याचा उपयोग राजकीय स्वारथा साठी कोला आहे.

महाराष्ट्रातील सरकारवर आरोप होत असताना शरद पवार दोन कार्ड काढतील हे मागच्या व्हिडीओत स्पष्ट झाले आहे. एक मुस्लिम समाजाचं आणि दुसर मराठा सामाजाचं. आणि असचं झालं त्यातून देवेंद्र फडणवीसांना ब्राम्हण नेता म्हणून बाजू मांडण्यास जड जाईल  अशा स्वरूपाचं कार्ड त्यांनी काढलं . रामदास स्वामींचा विषय काढत मराठा आणि ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करणं किंवा ब्राम्हणांच्या मनात मराठा समाजा विषयी अजिबात तेढ नाही , किंवा सकल मराठा समाजाच्या मनामध्ये ब्राम्हणांविषयी तेढ नाही. पण हा व्देष वाढवण्याच काम पवार करत आहेत. आणि राज्यात जातिय व्देष पसरवण्यात मदत होईल असा या मागचा हेतू पवार समर्थकांचा आहे . जातीय व्देष वाढल्यास आगामी निवडणूकीत राजकीय स्वार्थ साध्य करता येईल . यासाठी ब्राम्हण सामाजालाच लक्ष केलं जात आहे. कारण ब्राम्हण समाज प्रतिक्रियवादी नाही , उफाळून येवू शकत नाही आणि आलाच तर तो नेस्तानाभूत होईल अशी ती स्थिती असते. कारण हा धक्का गांधी हत्येनंतर ब्राम्हण समाजाने अनूभवला आहे.

Share