भारतीय शेअर मार्केट चा रेकॉर्ड !

भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा मोठा रेकॉर्ड केला आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये सुरू असलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स २७४ अंकांनी वर गेला. तर, निफ्टीदेखील ६६ अंकांनी वर जाऊन स्थिरावला आहे.

बँकिंग व्यतिरिक्त फार्मा, एफएमजीसी, मीडिया, कंझ्यूमर ड्यूरेबल्स, हेल्थकेअर अशा क्षेत्रांमधील शेअर्स देखील ग्रीन झोनमध्ये बंद झाले. तर ऑटो, ऑईल अँड गॅस, एनर्जी, मेटल अशा क्षेत्रांमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आज सेन्सेक्सच्या ३० पैकी १९ शेअर्समध्ये तेजी राहिली. तर, निफ्टीच्या ५० पैकी ३० शेअर्समध्ये तेजी राहिली.

आज सकाळी व्यवहार सुरू होताना शेअर मार्केटने उच्चांक गाठला होता. बाजार उघडताच सेन्सेक्स ६५,५०३.८५ अंकांवर पोहोचलं होतं. तर, निफ्टीनेही १९,४०६.६० अंकांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर आज दिवसभर शेअर मार्केटमध्ये तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Share