मराठी राजघराण्यात दरवर्षी उभारली जाते नववर्षाची गुढी

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मराठमोळा सण महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले मराठी राजघराणेही पारंपरिक पद्धतीने आजही साजरा  करत आहेत.  मध्यप्रदेशातील शिंदे राजघरण्यात ग्वाल्हेरच्या जयाजी चौकातल्या जयविलास राजवाड्यात परंपरेनुसार गुढी उभारली जाते. पूर्वी या दिवशी राजांची मिरवणूक काढली जायची, मात्र आता राजघराण्यातील मंदिरात डॉ. श्रीकृष्णा मुसळगावकर शास्त्री आणि त्र्यंबक शेंडे यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाप्रमाणे देवीची स्थापना करून नऊ दिवस देवी भागवताचे पठणही केले जाते. या राजघरण्यातले केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानीही गुढी उभरतात.

त्यानंतर इंदौर होळकर घराण्याचे वारसदार आता तिथल्या राजवड्यात राहत नाही पण राजवड्यातल्या आहील्याबाई होळकर ट्रस्टतर्फे गुढीपाडवा साजरा केला जातो. राजघराण्यातील नोंदीनुसार पूजाविधी केली जाते त्याचबरोबर सात मंदिरांत सात गुढ्या उभारल्या जातात मल्हारी मार्तंड मंदिरात पाडव्याची सुरुवात होते. मुंबईतून होळकर घराण्याचे वारसदार उषाराजे मार्गदर्शन करतात. पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जातो. सूर्योदयापूर्वी घटस्थापनेची तयारी केली जाते. मोठी गुढी उभारून सूर्यास्ताला उत्तरपूजा करून गुढ्या उतरवल्या जातात.

गुजरातमधील बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजघराण्याच्या सोळाव्या पिढीचे नेतृत्व समरजितसिंग गायकवाड करत आहेत ते त्यांच्या पत्नी राधिका राजे समावेत लक्ष्मी विलास राजवाड्यात गुढी उभारतात.  कडुलिंबाच्या चटणीचा प्रसाद दिला जातो.  इथले सर्व सण-उत्सव राजपुरोहितांच्या मंत्रपठणाने साजरे केले जायचे पूर्वी मराठी पुरोहित पाडव्याची पूजा करत. आता मात्र बडोद्याचे व्यास (मारवाडी) पुरोहित चार पिढ्यांपासून पूजा करतात. त्यानंतर तामिळनाडूमधील तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाऊ व्यंकोजीराजे यांचे वंशज तंजावर राजघराण्यात चंद्रमोहलीश्वर मंदिरात गुढीपाडवा उत्साहाने साजरा केला जातो.  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती बाबाजीराजे भोसले, युवराज छत्रपती आबाजीराजे, राजमाता विजयाराजे, गायत्रीराजे, धनश्रीराजे, शिवप्रियाराजे, शिवांजलीराजे, अवंतिकाराजे ही या गुढीपाडव्याच्या पूजेत सहभागी होतात.

Share