कंगनाची ‘आरआरआर’ साठी मधुरवाणी

मुंबईः एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. बॉलीवुड मधले बरेच सितारे ही या सिनेमाच दिलखुलासपणे कौतुक करताना दिसत आहेत. या कौतुकाच्या लाटेत आता बॉलीवुडची ‘’पंगा गर्ल’’ म्हणजेच कंगना रणौत ही सामील झाली आहे. या सिनेमाशी निगडीत एक विडियो इनस्टाग्रामवर तिने शेअर केलाय ज्यात तिने म्हटलय की, ‘’ तिच्या कुटुंबियासमवेत तिने हा सिनेमा पाहिला तिला हा सिनेमा आवडला. एस एस राजा मौली हे खूप चांगले डायरेक्टर आहेत. या सिनेमात ज्यू एनटीआर आणि रामचरण यांनी खूप चांगल काम केलंय,देशभक्तीने परिपूर्ण असा सिनेमा आहे’’ अस ही तिने या व्हीडियोच्या माध्यमातून सांगितलय. त्याचबरोबर या सिनेमाच्या थिएटर बाहेर एका पत्रकाराशी बोलत असतानाही ती म्हणाली की देशभक्ती तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा सिनेमा ब्लॉकबस्टर आहे असही तिने म्हटलय, लोकांनाही हा सिनेमा पाहण्याच आव्हान तिने केलय. २५ मार्चला रीलीज झालेल्या सिनेमाने अवघ्या सहा दिवसांत ४४८ कोटी पेक्षा जास्त कमाई केलीय आणि येणाऱ्या काळात ही हा सिनेमा याच गतीने कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

https://www.instagram.com/tv/CbzKNkCrLK4/?utm_source=ig_web_copy_link

 

चित्रपटाची कथा ब्रिटिश हुकुमशाही आणि हैदराबाद निजामाविरुद्ध लढलेले क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्याभोवती फिरते. चित्रपटात एनटीआर कोमाराम भीम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेता रामचरण अल्लुरी सीताराम यांची भूमिका साकारत आहे. ‘आर आर आर’ चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत. साऊथ सुपरस्टार रामचरण, अभिनेता एनटी रामाराव ज्युनियर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत, तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातून आलिया भट्ट आणि अजय देवगण दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केल आहे.

Share