शिवसेना माझाच पक्ष – उद्धव ठाकरे !

आज उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत . अकोला , अमरावती आणि नागपूर येथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध बैठका घेणार आहेत. शिवसेनेच्या पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे स्वतः मैदानात उतरून नव्याने पक्ष बांधणीची मोहीम हाती घेतली आहे . अमरावती येथील संवाद मेळाव्यात त्यांनी सोडून गेलेले नेते , कार्यकर्ते तसेच भाजपवर कडाडून टीका केली.
शिवसेना हा माझाच पक्ष असून निवडणूक आयोगाला त्याच्या निवडीबाबत काहीही अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट केले . याबाबत सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी दाखवला . बोगस बियाणे गेली आता नव्याने नांगरु अस म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लावला . “प्राण जाये पार वचन न जाये ” अशी हिंदुत्वाची व्याख्या सांगत आपलच हिंदुत्व साफ व स्वच्छ असल्याचे त्यांनी ठणकाहून सांगितले .

Share