पवारांच्या नादी लागाल तर डोकं फुटायची वेळ येईल – बच्चु कडू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, असे बच्चू कडू यांनी कोल्हापुरात म्हटले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने तर राष्ट्रवादीत फूट पडलीय असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. तर, शरद पवार यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम होत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. हा प्रतिक्रियांचा धुरळा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी त्यात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी तर डोकं फुटायची वेळ येईल, असं विधानच केलं आहे.

 

Share