अभिनेता कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-२ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. दोन आठवड्यात या सिनेमानं २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याच दरम्यान आता कार्तिकला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: त्याने  इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याने याबाबत माहिती दिली आहे.

कार्तिकला याआधी देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कार्तिकने आपल्या हटके अंदाजात याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. “सर्व काही इतकं पॉझिटिव्ह सुरू होतं की कोरोनाला राहावलं नाही” असं म्हटलं आहे. तो कोविड पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीने चाहते निराश झाले आहेत चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CeYQXUWtN42/?utm_source=ig_web_copy_link

 भूल भुलैय्या-२ नं जिंकली प्रेक्षकांची मनं 

कार्तिकचा भूल भुलैय्या-२सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत जगभरात २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिकसोबतच कियारा अडवाणी आणि तब्बू यांनी प्रमुख भूमिका साकारली. पहिल्या आठवड्यात भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं ९२.०५ कोटी एवढी कमाई केली. तर आठव्या दिवशी ६.५२ कोटी आणि नवव्या वर्षी ११.३५ कोटी कमाई या चित्रपटानं केली.

Share