पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण, उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना दिलासा

मुंबई :राज्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असतानाच पावासाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभाग खात्याने वर्तवली आहे. आज सकाळीच मुबंई आणि पुणे शहरात पावासाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे येथील नागरिकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय हवामान विभागातर्फे कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तापमान वाढीमुळे विदर्भात उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र आता पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हापासुन काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

आज मुंबई शहरात सकाळपासुन ढगाळ वातावरण आहे. मुंबईत काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दादर, परळ भागत पाऊस झाला आहे. पुण्यात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभाग खात्याने अंदाज वर्तवला आहे.

अचानक झालेल्या पावासामुळे मुंबईकरांची उडाली तारांबळ
मुंबईत काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तरल ढगाळ वातावरणाने पावसाच्या सरींची दाट शक्याता हवामान विभाग खात्याने वर्तवली आहे. या व्यतिरीक्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Share