गुजरातमधील भरूजच्या दहेज मधील केमिकल फॅक्टरीत स्फोट

 

गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील दहेज येथे एका रासायनिक कारखान्यात आज पहाटे तीन वाजता भीषण आग लागली. ज्यात सहा मजुरांचा मृत्यू झाला,अहमदाबादपासून सुमारे  २३५ किमी अंतरावर असलेल्या दहेज औद्योगिक परिसर आहे. येथील कामगार एका रिअ‍ॅक्टरजवळ काम करत असताना अचानक स्फोट झाला याघटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.

ओम ऑरगॅनिक कंपनीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवर दिसत होते. अपघातानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेने मृताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आग इतकी भीषण होती की कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले. पोलिसांसोबतच आरोग्य विभागही या घटनेचा तपास करत आहे. कंपनीतील अग्निसुरक्षा उपकरणे कंपनीत होती की नाही, याचीही तपासणी पोलीस करत आहेत.

दोन वर्षांपूर्वी भरूचच्या दहेज येथील यशस्वी केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाला होता. ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५२ जण जखमी झाले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १०  गाड्या लागल्या होत्या. केमिकल रिअ‍ॅक्शनमुळे आजूबाजूच्या गावातून ५ हजार लोकांना स्थलांतरित करावे लागले होते.

त्यानंतर गेल्यावर्षीही भरूचमध्ये फॉस्फरस बनवणाऱ्या केमिकल फॅक्टरीत स्फोट होऊन आग लागली होती. या अपघातात २४ कर्मचारी जखमी झाले होते, तर ५ बेपत्ता होते. स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज २०  किलोमीटरपर्यंत ऐकू येत होता

 

Share