जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

तीनच दिवसांमध्ये तीन वेळा बदलले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

तीन दिवसांपूर्वी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यानंतर बुधवारी हा ताज अमेझॉनच्या जेफ बेझोस यांनी हिसकावला होता. आता या दोघांनाही मागे टाकत फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

लुई व्हिटॉन आणि अशाच कित्येक लग्झरी ब्रँड्सचे मालक असणारे बर्नार्ड अरनॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार आता त्यांची नेट वर्थ (Bernard Arnault Net Worth) 197 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे.

सध्या दुसऱ्या क्रमांकावर अमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos Net Worth) हे आहेत. त्यांची नेट वर्थ ही 196 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. तर इलॉन मस्क (Elon Musk Net Worth) हे या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची नेट वर्थ 189 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे.

Share