‘पुष्पा’ चित्रपटाचा नवा रेकॉर्ड, जगभरात कमावले कोट्यावधी

मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.

‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवीन रेकॉर्ड केला आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Share